१) महाराष्ट्रातील अल्पसंख्याक अधिकारी -कर्मचारी यांचेसाठी (MRAAKA) संघटना वरदान ….. !
मा.डॉ.सादिक पटेल,
२) संघटनेच्या (MRAAKA) व्यासपीठावर विधायक कामे करू …..!
मा.डॉ. मकसूद खान.
३) अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी यांचे हितासाठी स्थापन झालेल्या (MRAAKA) संघटनेमुळे आपल्या सर्वांना बळ व ओळख मिळते…..!
मा.अजिज शेख.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) कार्यगौरव/ सत्कार कार्यक्रम २०२५ इस्लाम जिमखाना , मुंबई येथे शुक्रवार दिनांक ०७/०२/२०२५ रोजी आयोजित करणेत आला होता.
असोसिएशनचे मुख्य आश्रयदाता व गुणश्री प्राध्यापक, जे.जे.हॉस्पिटल मा.डॉ.सादिक पटेल साहेब हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते .
मा.महोदय यांनी असोसिएशनची यशस्वी वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात चालू असून अनेक उपक्रम घेवून सर्व समाजाला बरोबर घेऊन आम्ही जात आहोत असे सांगितले व महाराष्ट्रातील अधिकारी – कर्मचारी यांनी समाजाच्या सक्षमीकरणासाठी संघटनेच्या व्यासपीठावर एकत्र यावेत असे आवाहन केले.
*या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून मा.डॉ.अब्दुल वाहिद, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मा.डॉ.मकसूद खान माजी सी.ई. ओ.केंद्रीय हज कमिटी,
मा.डॉ.नागसेन रामराजे, माजी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मा.न्या.सदरूद्दिन काझी, माजी जिल्हा न्यायाधीश व न्यायिक सदस्य, मुंबई पोर्ट ट्रस्ट , मा..डॉ.डेव्हिड अल्वारीस, माजी राज्यकर सह आयुक्त व सदस्य, विक्रीकर न्यायाधिकरण, मा.श्रीमती ऐनुल अत्तार, माजी सह सचिव, मंत्रालय, मा.फैयाज खान, मुख्य महाव्यवस्थापक, सिडको, मा. मोहसीन शेख, सचिव, इस्लाम जिमखाना, मा.डॉ.अमजद पठाण, कॅन्सर तज्ञ, हे होते.
या कार्यक्रमामध्ये मा. अजिज शेख साहेब यांची भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये (आय. ए .एस.) निवड झाल्याने विशेष सन्मानाने सत्कार करणेत आला.
गौरवमूर्ती या नात्याने मा.अजिज कारचे, माजी आयुक्त, महानगरपालिका, मा.इरफान काझी, माजी नगर रचना संचालक, बी.एम.सी., मा.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो, दिवाणी कोर्ट, हे होते.
सत्कारमूर्ती या नात्याने मा.हाजी जतकर, राज्यकर सह आयुक्त, मा.मोईन ताशिलदार, उप सचिव, मंत्रालय, मा.अशफाक शेख, माजी सहायक संचालक, नगर रचना, मा.नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त, मा.नासिर बिराजदार, माजी कार्यकारी अभियंता, जलसंपदा, मा.अयुब तांबोळी, तहसीलदार , हे उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित असलेल्या सर्व अतिथी यांना असोसिएशनचे सन्मानचिन्ह व बुके देऊन स्वागत व सत्कार करणेत आला.
संघटनेप्रति उत्कृष्ठ कार्य केलेले व भरीव योगदान दिलेले मार्गदर्शक व अधिकारी मा.अजिज कारचे, माजी आयुक्त, महानगरपालिका, मा.अशफाक शेख,, माजी सहायक संचालक, मा.नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त, मा. नासिर बिराजदार,माजी कार्यकारी अभियंता, मा.सय्यद जुबेर,माजी कार्यकारी अभियंता, म्हाडा, मा.मोइज शेख,माजी उप अधीक्षक, बी.एम.सी. मा.एन.जी.शेख,माजी सर्वेहर, सिडको, यांचा असोसिएशनचे सन्मानचिन्ह, शॉल व बुके देऊन सत्कार करणेत आला.
प्रशासनात पदोन्नती झालेले अधिकारी श्री.जावेद काझी, सहायक राज्यकर आयुक्त, श्री.शकील शेख, विभागीय अधिकारी, पर्यावरण विभाग, श्री.अयुब तांबोळी, तहसीलदार, श्री.समीर पेरामपल्ली, कार्यकारी अभियंता, सिडको, श्री.मोहसीन बागवान, कक्ष अधिकारी, मंत्रालय,श्री.नासिर खान, उप अधीक्षक, बी.एम.सी.,श्रीमती सायरा बानो अन्सारी, उप अधीक्षक, भिवंडी महानगर पालिका, श्री.इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी, श्री.तन्वीर मुजावर, सहायक कक्ष अधिकारी, श्री. गौस इनामदार, लिपिक, या सर्वांचा सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी कर्मचारी श्रीमती समीना बागवान , सहायक राज्यकर आयुक्त, श्रीमती शागुफ्ता पटेल,महसूल सहायक, श्री.नौशाद पठाण, महसूल सहायक, श्री.अकबर जतकर ,लिपिक, मंत्रालय, श्री.शाकीर पटेल, शिपाई या सर्वांचा असोसिएशनचे सन्मानचिन्ह व बुके देऊन सत्कार करणेत आला.
या कार्यक्रमामध्ये असोसिएशनचे चिटणीस व माजी राज्यकर उपायुक्त मा.नजीर शेख यांनी असोसिएशनचे उद्देश विषद करताना राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे असून असोसिएशनच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकला व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल उपयुक्त उपाययोजना सांगितल्या. याशिवाय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या Service to the Society is Service to the Nation या उक्तीप्रमाणे करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात मान्यवर मा.डॉ.सादिक पटेल, मा. डॉ.अब्दुल वाहिद, डॉ.मकसूद खान, मा.डॉ.नागसेन रामराजे , मा.न्या. सदरुद्दिन काझी, मा.डॉ.डेव्हिड अल्वारीस, मा.अजिज शेख, मा.इरफान काझी, मा.हाजी जतकर, मा.मोईन ताशिलदार, यांनी आपले विचार मांडले.
विशेष सत्कारमूर्ती या नात्याने बोलताना मा. अजीज शेख यांनी संघटना स्थापन झाल्यापासून आजपर्यंत आढावा घेऊन कौतुक केले व यापुढेही आपण नेहमीच असोसिएशनचे मार्गदर्शनासाठी तत्पर असल्याचे सांगून महाराष्ट्रात आपल्या सर्वांना संघटनेमुळे बळ व ओळख मिळत असून अधिकारी कर्मचारी तसेच समाजाची अनेक कामे मार्गी लागत असल्याचे सांगितले याचबरोबर एकीने राहिल्याने अनेक विधायक कामे होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात मा.मोहम्मद युसुफ निशाणदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको, (उपाध्यक्ष), मा.सुहेल खान, कार्यकारी अभियंता, सिडको (सह खजिन दार ), मा.जानमोहम्मद पठाण, माजी सहायक पोलिस आयुक्त (चिटणीस), डॉ.शमीम शेख, माजी सहायक पशुसंवर्धन आयुक्त (सदस्य), डॉ.पीरसाब अत्तार, विभागप्रमुख, व्हीं.जे टी.आय.(चिटणीस), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्रीमती असमा सय्यद, सहायक राज्यकर आयुक्त (सदस्या), डॉ.अल्लाउद्दीन शेख (प्राध्यापक), श्री. अफजलभाई शेख (उद्योगपती), श्री. काय्युम कुरेशी, माजी राज्यकर अधिकारी (सदस्य), श्री. अब्दुल सत्तार शेख, राजपत्रित स्टेनो,मंत्रालय (सदस्य), श्री.उस्मान शेख, लेखा व वित्त अधिकारी ,म्हाडा (सदस्य), श्री.अब्दुल रझाक मुल्ला,विस्तार अधिकारी, जि . प.(सदस्य), श्री.मोहमद आरिफ, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.आसिफ सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.जुबेर सय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्री.हैदर शेख, सहकार अधिकारी (सदस्य), श्री.मेहमूद शेख, मुख्याध्यापक (सह खाजिनदार), श्री. कय्यूम दाखवे , मुख्याध्यापक (सह खजिनदार), श्री.इरफान बेलोसे, माजी शिक्षक (सदस्य), श्री.अजीम मुल्ला , शिक्षक (सदस्य), श्री. श्री.अखलाख शेख, शिक्षक (सदस्य), श्री.फारुख खाटीक, शिक्षक (सदस्य), श्री.नदीम पटेल, शिक्षक (सदस्य), श्री.शेरू सय्यद, शिक्षक (सदस्य), श्री.शकील शेख, व्यवस्थापक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (सदस्य),श्री. गौस इनामदार, लिपिक (सदस्य), श्री.मोहम्मद जतकर, कर सहायक. (सदस्य), यांचेसह वेगवेगळ्या विभागातील ८५ नामवंत, मान्यवर, अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.नासीर खान व श्री.फारुख खाटीक यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले.
आभार प्रदर्शन डॉ.पिरसाब अत्तार यांनी मांडले.
बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करणेत आली.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.