महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन तर्फे, मा.श्री.मुश्ताक अंतुले साहेब, यांची अध्यक्ष, मौलाना आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले व मा.महोदय यांना यशस्वी वाटचालीबद्दल मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मौलाना आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने समाजासाठी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावून त्याचा फायदा समाजास मिळवून देऊ असे मा .अध्यक्ष यांनी आवर्जून सांगितले. याशिवाय मा.महोदय यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय,कार्यतत्पर व कर्तव्यतत्पर मुख्यमंत्री मा. कै. ए.आर.अंतुले साहेब यांच्या मुखमंत्री कारकिर्दीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला त्यामुळे मा. ए.आर.अंतुले साहेब हे खरोखर महान व्यक्तिमत्त्व होते हे अधोरेखित झाले .जवळपास २ तास मा.महोदय यांनी अनेक विषयावर चर्चा केली.
याशिवाय असोसिएशनच्या माध्यमातून अनेक चांगले प्रस्ताव द्यावेत जेणेकरून समाजासाठी चांगले निर्णय घेऊन समाजाचे सक्षमीकरण निर्माण करण्याचा आपला मानस आहे असे सांगितले.
याप्रसंगी मा.डॉ.सादिक पटेल साहेब, गुणश्री प्राध्यापक व माजी विभागप्रमुख, जे.जे.रुग्णालय (मुख्य आश्रयदाता), मा.अजीज शेख साहेब (आय. ए.एस.), कार्यकारी संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, महारष्ट्र राज्य ( ज्येष्ठ उपाध्यक्ष), श्री. हाजी जतकर , राज्यकर सह आयुक्त (अध्यक्ष), श्री.मोहम्मद युसुफ निशाणदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री. नजीर शेख, माजी राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री.गफार मगदूम, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (सदस्य), श्री. सुहेल खान, माजी कार्यकारी अभियंता,सिडको (सह खजिनदार ), डॉ. पिरसाब अत्तार, सहयोगी प्राध्यापक,व्ही.जे टी.आय. (सदस्य), श्री.मेहमूद शेख, पदवीधर शिक्षक (सह खाजिनदार), श्री.राजाभाऊ कांदळकर, सामजिक विचारवंत (हितचिंतक), हे उपस्थित होते.