मा.श्री.रत्नाकर गायकवाड सर (आय.एस.एस.), यांची पुणे येथे सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA ) चे प्रेरणास्रोत व आधारस्तंभ मा.श्री.रत्नाकर गायकवाड सर (आय.एस.एस.), माजी मुख्य सचिव व माजी मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे येथे सदिच्छा भेट घेतली.

आदरणीय महोदय यांनी असोसिएशन (मरक्का) च्या वाटचालीबद्दल अतिशय आस्थेने विचारपूस केली व भविष्यात काय करायला पाहिजे याबद्दल अनेक पैलूवर मार्गदर्शन केले.

असोसिएशन (मरक्का) च्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी यांचे हितासाठी पतसंस्था स्थापन केल्यास अनेक सभासद यांना मदत होईल व असोसिएशनला विधायक कामे करणेसाठी सर्वतोपरी मदत होईल असे मोलाचे मार्गदर्शन आदरणीय महोदय यांनी केले. याशिवाय समाजाच्या सक्षमीकरणासाठी अल्पसंख्याक व बुद्धीस्ट समाजातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी एकत्रित येऊन काम केल्यास दोन्ही समाजाची अनेक कामे मार्गी लागतील व विशेषता बुध्दीस्ट समाजातील अनेक अधिकारी आय. ए.एस.,आय. एफ .एस., आय.पी.एस.,आय.आर.एस.,या प्रशासनातील सर्वोच्च पदावर कार्यरत असून राज्य शासकीय सेवेमध्ये सुध्दा संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागामध्ये अनेक अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांची मदत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेता येईल असे सांगून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या आदर्श विचारसरणीचा अंगीकार करता येईल असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच बहुजन हिताय संघ व असोसिएशन (MRAAKA) यामधील २०० पदाधिकारी/अधिकारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे आयोजित करणे संदर्भात सखोल चर्चा करणेत आली व या शिबिरामध्ये आदरणीय महोदय हे स्वतः मार्गदर्शन करणेसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

आदरणीय सरांची प्रेरणा, आधारस्तंभ पाठींबा, बहुमोल मार्गदर्शन व प्रत्येक क्षणी नैतिक पाठींबा असोसिएशन (मरक्का) ला सदैव मिळत असल्याने असोसिएशनची यशस्वी वाटचाल संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे जवळपास ५० हजारांच्या जवळपास सभासद संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत असे आनंदाने म्हणावे लागेल.

याप्रसंगी मा.श्री.विजय रणपिसे साहेब, माजी मुख्य महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया व विश्वस्त,बहुजन हिताय संघ, श्री.हाजी जतकर, राज्यकर सह आयुक्त (अध्यक्ष), श्री.नजीर शेख,माजी राज्यकर उपायुक्त (चिटणीस), श्री. जानमोहम्मद पठाण, माजी सहायक पोलिस आयुक्त (चिटणीस), श्री.शमीम शेख, माजी सहायक पशू संवर्धन आयुक्त (सदस्य), श्री.अब्दुल रझाक मुल्ला, विस्तार अधिकारी,जिल्हा परिषद (सदस्य) हे उपस्थित होते.